बंगळुरू - लंडनमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान आज(सोमवार) सकाळी बंगळुरात दाखल झाले. एअर इंडियाच्या बोईंग विमानातून ३२६ प्रवाशांना परत आणण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी ४.४१ वाजता हे विमान भारतात पोहचले. प्रवाशांमध्ये तीन बालकांचाही समावेश आहे.
मिशन वंदे भारत: लंडनमध्ये अडकलेले ३२६ भारतीय मायदेशी परतले
परदेशात अडकलेल्या नागरिकांना माघारी आणण्यासाठी भारत सरकारने मिशन वंदे भारत सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १५ हजार नागरिकांना परत आणले जात आहे.
निर्धारित वेळेपेक्षा फ्लाईट १ तास ४० मिनिटे उशिरा आले. परतलेल्या सर्व प्रवाशांना शहरातील विविध हॉटेलांमध्ये १४ दिवस क्वांरटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांची चाचणीही घेण्यात येणार आहे. एअर इंडिया फ्लाईट १८०३ वेलकम बॅक इन इंडिया असे ट्विट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले.
परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने मिशन वंदे भारत सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १५ हजार नागरिकांना परत आणण्यात येत आहे. त्यानंतर दुसरा टप्पा सुरु करण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांना सोशल डिस्टंन्सिंग आणि सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. १४ दिवसानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.