लखनौ- कोझीकोड विमानतळावर झालेल्या अपघातात सह-वैमानिक अखिलेश कुमार यांचे निधन झाले. त्यांची गर्भवती पत्नी पंधरा ते सतरा दिवसांत मुलाला जन्म देणार आहे. अशा स्थितीतही अखिलेश कुमार 'वंदे भारत' मोहिमेमध्ये भारतीयांना विदेशातून आणण्यासाठी कर्तव्यावर रुजू झाले होते.
सह-वैमानिक अखिलेश कुमार यांनी एअर इंडियात 2017 मध्ये आयएक्स-1344 या विमानाच्या पहिल्या उड्डाणापासून सहवैमानिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह 19 जणांचा कोझीकोड विमानतळावरील अपघातात मृत्यू झाला आहे.
त्यांचा 2017 मध्ये मेघा यांच्याबरोबर विवाह झाला. टाळेबंदी जाहीर केल्यानंतर ते एकदा मूळगावी परतले होते. अचानक व अनेपेक्षितपणे विमान अपघातात कुमार यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.