नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, प्रवासी त्यापुढील काळात प्रवासाचे तिकिट बुक करू शकत होते. मात्र, आता एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवेचे बुकिंग बंद केली आहे. आज(शुक्रवार) पासून हा निर्णय लागू असणार आहे.
'या' तारखेपर्यंत एअर इंडियाची सर्व बुकिंग सेवा बंद - एअर इंडिया बुकिंग रद्द
14 एप्रिलनंतर सरकार काय निर्णय घेईल, याची आम्ही वाट पाहत असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
14 एप्रिलनंतर सरकार काय निर्णय घेईल, याची आम्ही वाट पाहत असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर नागरी उड्डान मंत्रालयाने सर्वात आधी आंतराष्ट्रीय विमान सेवा बंद केली. त्यानंतर देशांतर्गतही विमानसेवा बंद करण्यात आली आहे. आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांना आता संचारबंदीमुळे आणखी फटका बसला आहे. यातील काही कंपन्यांनी कर्नचाऱ्यांचा पगार कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरामध्ये 24 मार्चला लॉकडाऊन 3 आठवड्यांसाठी घोषित करण्यात आला आहे. आता 14 एप्रिलनंतर सरकार काय निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. संचारबंदीमुळे देशभरातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना प्रसाराचा आढावा घेऊन पुर्णपणे संचारबंदी उठवायची की संवेदनशील भाग सोडून इतर भागात जनजीवन सुरळीत करायचे यावर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारांकडूनही केंद्र सरकारने कल्पना मागितल्या आहेत.