नवी दिल्ली - निवृत्त एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईचं समर्थन केलंय. पुलवामा इथं झालेला हल्ला हा भारतीय नागरिक, सैन्य यांचा संयमाचा अंत ठरल्याचं त्यांनी सांगितलं.पाकिस्तानला जरब बसवण्यासाठी अशा एका कारवाईची गरज होती, असंही ते म्हणाले. आपली अब्रू राखण्यासाठी DENIAL IS THE FORM OF PAKISTANI TACTICS आणि या ही वेळेस पाकिस्तानने तेच केलं असंही टिपणीस म्हणाले.
. . .तर पीओके ताब्यात घेतलं पाहिजे - निवृत्त एअर चिफ मार्शल अनिल टिपणीस - Jammu
निवृत्त एअर चिफ मार्शल अनिल टिपणीस यांनी पाकिस्तानवर केली सडकून टीका. म्हणाले पाकिस्तान आपल्याला शत्रूच समजत असेल, तर चांगूलपणा दाखवून काय फायदा. ?
गेल्या सत्तर वर्षात आपण जी युद्ध जिंकलो, त्या युद्धात आपण कागदावर सपशेल अपयशी ठरलो. त्यातून आपल्याला काय मिळालं असा सवालही टिपणीस यांनी विचारला. पाकिस्तानशी चांगलं वागूनही पाकिस्तान आपल्याला शत्रूच समजत असेल तर चांगुलपणा दाखवून काय उपयोग, असही टिपणीस म्हणाले.
आता पाकिस्तानच्या वृत्तीला ठेचलं पाहिजे. आता आपलं संरक्षण करण्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे असं सांगतानाचं सिंध, बलुचिस्तान, पख्तुनिस्तान सारखी छोटा राज्य त्यांच्या विरोधात उठाव करायला सज्ज आहेत. त्यामुळं आता न थांबता पिओके सुद्धा ताब्यात घेतलं पाहिजे असंही टिपणीस म्हणाले.