नवी दिल्ली- पश्चिम बंगालमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. यामुळे डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले आहे. आता, दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनीही प्रथम डोक्याला पट्टी बांधत घटनेचा निषेध केला. यावेळी एम्सच्या डॉक्टरांनी थोड्यावेळाने संप करत पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना समर्थन दर्शविले आहे.
पश्चिम बंगालच्या डॉक्टरांच्या समर्थनार्थ देशभरातील 'एम्स'च्या डॉक्टरांचा संप
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी एम्स रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (आरडीए) देशभरातील डॉक्टरांना संपात सहभागी होण्यास सांगितले आहे.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी एम्स रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (आरडीए) देशभरातील डॉक्टरांना संपात सहभागी होण्यास सांगितले आहे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरासोबत होणार मारहाण आणि वाढणारी हिंसा चिंतित करणारी आहे. येथे कायदा-सुव्यवस्था राहिली नाही. सरकार डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्यास अपयशी ठरली आहे. आरडीए अशा घटनांमुळे दुखी आहे. एम्स आरडीए पश्चिम बंगालमधील सहकाऱ्यांसोबत उभी आहे.
यावेळी आरडीएने पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या समर्थनार्थ १३ जूनला प्रदर्शन तर १४ जूनला एक दिवस संप आयोजित करण्याचे ठरवले आहे. यावेळी, आपत्कालीन विभाग सोडून ओपीडी, नियमित आणि वॉर्ड सेवा बंद राहणार आहे.