महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड केवळ जातीयवादी नाटक करत आहे; भाजप खासदाराची टीका

'ईटीव्ही भारत'शी बोलताना सिन्हा यांनी सांगितले की, अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक होता. ५०० वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर अगदी शांततेत तोडगा निघाला आहे. या निर्णयामुळे ना कोणी दुःखी झाले, ना कोणी याचा विजय साजरा केला. मात्र, आता मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड जे करत आहे, ते सर्व जातीयवादी नाटक आहे.

Ayodhya Title Dispute

By

Published : Nov 18, 2019, 4:15 PM IST

नवी दिल्ली -'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड'ने अयोध्या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, हा सर्व प्रकार म्हणजे केवळ जातीयवादी नाटक असल्याची टीका भाजप राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी केली आहे.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड केवळ जातीयवादी नाटक करत आहे - भाजप खासदार सिन्हा

'ईटीव्ही भारत'शी बोलताना सिन्हा यांनी सांगितले की, अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक होता. ५०० वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर अगदी शांततेत तोडगा निघाला आहे. या निर्णयामुळे ना कोणी दुःखी झाले, ना कोणी याचा विजय साजरा केला. मात्र, आता मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड जे करत आहे, ते सर्व जातीयवादी नाटक आहे.

ध्रुवीकरणाचे राजकारण करत एआयएमपीएलबी हे देशातील सलोख्याला तडा देण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. त्यांच्यातर्फे फिर्याद देणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनादेखील हा निर्णय मान्य आहे, असे म्हणत त्यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि एमआयएमचे ओवैसी यांसारख्या नेत्यांना बरखास्त केले गेले पाहिजे असे मत व्यक्त केले.

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करत, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने आपण याबाबत असमाधानी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सईद कासिम रसूल अय्याज यांनी काल हे स्पष्ट केले. शरिया कायद्यानुसार आम्ही दुसरी कोणती जमीन स्वीकारू शकत नाही, त्यामुळे बाबरी मशीद असलेली जमीनच आम्हाला हवी आहे. म्हणूनच, निकालानंतर ३० दिवसांच्या आतच पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सुन्नी वक्फ बोर्डचे वकील झफरयाब जिलानी यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा :अयोध्या प्रकरण : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड दाखल करणार पुनर्विचार याचिका

ABOUT THE AUTHOR

...view details