नवी दिल्ली -अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करत, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) आपण याबाबत असमाधानी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सईद कासिम रसूल अय्याज यांनी आज हे स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला अयोध्याप्रकरणी निकाल जाहीर केला होता. विवादीत जमीन ही राम जन्मभूमीच असून बाबरी मशिदीकरता वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
तर शरिया कायद्यानुसार आम्ही दुसरी कोणती जमीन स्वीकारू शकत नाही, त्यामुळे बाबरी मशीद असलेली जमीनच आम्हाला हवी आहे. त्यामुळे, निकालानंतर ३० दिवसांच्या आतच पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सुन्नी वक्फ बोर्डचे वकील झफरयाब जिलानी यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, आम्हाला १०० टक्के खात्री आहे, की आमची पुनर्विचार याचिका फेटाळली जाईल. तरीही आम्ही ही याचिका दाखल करणारच आहोत, असे 'जमैत उलेमा-ए-हिंद'चे मौलाना अर्शद मदानी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : 'ओवैसी म्हणजे दुसरे अल बगदादीच..'