महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'संपूर्ण हिंदुस्तानात एमआयएम आपला झेंडा फडकावताना जग पाहिल' - ऑल इंडिया मजलिस ए इत्तहादुल मुस्लिमीन पक्ष

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहार विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय यशस्वी झाल्यानंतर त्यांचे बंधू अकबरुद्दीन यांनी एमआयएम पक्षाला संपूर्ण भारतात पसरवण्याचे वक्तव्य केले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Nov 15, 2020, 3:29 PM IST

हैदराबाद - बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाला पाच जागा मिळाल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहार विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय यशस्वी झाल्यानंतर त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एमआयएम पक्षाला संपूर्ण भारतात पसरवण्याचे वक्तव्य केले आहे.

'इतिहासात नवी तारीख लिहली जाईल'

'एमआयएमचा विजय हिंदुस्तानच्या इतिहासात एक नवी तारीख लिहील. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष (AIMIM) संपूर्ण भारतात झेंडा फडकावेल आणि हे संपूर्ण जग पाहिल, असे अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले.

दरम्यान, बिहारची जनता कोणाची गुलाम नाही, आता पश्चिम बंगालमध्येही निवडणुका लढवण्यावर विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया बिहारच्या निकालानंतर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिली होती. “पाच वर्षांपूर्वी आम्ही बिहारमध्ये सहा जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी पाच जागांचे आमचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. आमचा सहाच्या सहा जागांवर पराभव झाला होता. आम्ही तरीही खुप परिश्रम घेतले आणि सीमांचलच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिले. जनतेने आम्हाला मतदान केले आणि प्रेम दिले. असे ओवैसी म्हणाले होते.

दरम्यान, नितीश कुमार यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. एनडीएच्या विधिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली होती, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. एनडीएमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांची निवड होते की, नाही याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, निवडणुकीपूर्वीच ठरल्याप्रमाणे नितीश कुमार यांचीच मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात येईल, असे भाजपाने स्पष्ट केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details