नवी दिल्ली - एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसवर टीका केली आहे. तुम्ही मोदींच्या नावावर नेहमीच जिंकू शकत नाही. हे हरियाणामधील निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. तर काँग्रेसनं हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये चांगले काम न केल्यामुळे दोन्ही राज्यामधील प्रादेशिक पक्षांना यश आले असल्याचं असदुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत.
महाराष्ट्रामध्ये आम्ही मतधिक्याने जिंकून येऊ, असा दावा भाजपने केला होता. मात्र भाजपला अपेक्षित होता असा निकाल लागला नाही. याचबरोबर भाजपला हरियाणामध्ये सुद्धा बहूमत मिळाले नाही. त्यामुळे भाजपने धु्र्वीकरणाचे राजकारण सोडून देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि ग्रामीण भागातील समस्यांवर लक्ष द्यायला हवे, असा टोला ओवेसी यांनी भाजपला लगावला आहे.