नवी दिल्ली - सध्या अवघा देश कोरोनासोबत लढत आहे. दरम्यान, एम्स रुग्णालयात बरेच बाहेरील देशातील डॉक्टर काम करत आहेत. सध्याच्या कोरोना रुग्णांवर तेदेखील उपचार करत असून त्यांना भारत सरकारने योग्य तो आर्थिक मोबदला देण्याची मागणी एम्सच्या रेजिडेंट असोसिएशनने केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून यासंदर्भातली मागणी केली आहे.
'एम्स'मधील परदेशी डॉक्टरांना योग्य मोबदला द्या, पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी - एम्स डॉक्टर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून यासंदर्भातली मागणी केली आहे.
AIMS
सध्या देशात कोरोनाचे संकट आहे. डॉक्टर आपला जीव धोक्यात घालत कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. अशावेळी काही परदेशी डॉक्टर एम्समध्ये काम करत आहेत. त्यांना अशावेळी आर्थिक भत्ता देण्याची मागणी एम्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आदर्श प्रताप सिंह यांनी पंतप्रधान यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच त्यांना योग्य मोबदला दिल्यास त्यांनाही या संकट काळात काम करण्यास बळ मिळेल असे या पत्रात म्हटले आहे.