नवी दिल्ली - एम्समध्ये 80 टक्के नर्सिंग अधिकाऱ्यांच्या जागा महिलांसाठी राखीव असतील, या नव्या आदेशाला विरोध होत आहे. हा आदेश परत घेण्यासाठी एम्सच्या पुरुष नर्सिंग अधिकाऱ्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
एम्समधील आरक्षणाचा आदेश परत घ्या, पुरुष अधिकाऱ्यांची पंतप्रधानांना मागणी - एम्स नवी दिल्ली
एम्सचे नर्सिंग अधिकारी अरविंद चौधरी सांगतात, की या आदेशामुळे बीएससी नर्सिंगचा अभ्यास करणाऱ्या लाखो युवकांचे करीअर सुरू होण्याआधीच संपेल. त्यांच्या पदवीचा काहीच उपयोग राहणार नाही. 80 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करणे हा तरुणांवर अन्याय आहे, असेदेखील चौधरी म्हणाले.

गेल्या अनेक दशकांपासून पुरुष अधिकारी त्यांच्या मेहनतीने या हे पद सांभाळत आले आहेत. कोरोनाच्या काळातदेखील पुरुष अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. मग एम्ससारखी संस्था भेदभाव कसा करू शकते, असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे. तसेच संस्थेच्या या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर आंदोलन उभारणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.