नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधनसह सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. दरम्यान, भाजपने राष्ट्रीय नेतृत्वात मोठा बदल केला आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पूर्वसुरी अमित शाह यांनी निवडलेल्या नेत्यांना नारळ दिला आहे.
असे आहेत नवे बदल
भाजपचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक म्हणून संजय मयुख यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शाहनवाझ हुसेन आणि राजीव प्रताप रुडी यांची नियुक्ती पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी केली आहे. तर राधामोहन सिंह यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केले आहे.
तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी निवड केलेल्या अनेक नेत्यांना बदलण्यात आले आहे. शाम जाजू, अविनाश राय खन्ना आणि राम माधव या नेत्यांना पदापासून दुर करण्यात आले आहे. अनिल शाह अमित शाहांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात महासचिवपदी होते. त्यांचाही नव्या नेतृत्वात समावेश करण्यात आला नाही. नड्डा यांनी महिला आणि तरुण नेतृत्त्वाच्या हाती धुरा दिली आहे. ईटीव्ही भारतनेही यासंबंधी वृत्त दिले होते. त्यानुसारच बदल झाले आहेत.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दार आणि खासदार अन्नपूर्णा देवी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नेमण्यात आले आहे. तर अंदमान निकोबारचे प्रमुख तरुन छग यांची बढती राष्ट्र्रीय सचिव पदावरून महासचिव पदी करण्यात आली आहे.
युवा मोर्चाच्या प्रमुखपदी तेजस्वी सुर्या
पश्चिम बंगालचे मुकूल राय यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रमुखपदी दक्षिण भारतातील तेजस्वी सुर्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओडिशातील बैजनाथ जय पांडा आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजकुमार चहार यांची किसान मोर्चाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय आणि सी. टी. रवी यांना राष्ट्रीय महासचिव पदावर कायम केले आहे.