महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'किमान आधारभूत किमतीला हात लावणार नाही, शेतकऱ्यांच्या सर्व शंका दुर करू' - शेतकरी आंदोलन दिल्ली बातमी

केंद्र सरकारबरोबरची शेतकऱ्यांची पाचवी बैठकही निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता पुन्हा ९ डिसेंबरला केंद्रासोबत शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे.

नरेंद्रसिंह तोमर
नरेंद्रसिंह तोमर

By

Published : Dec 5, 2020, 8:04 PM IST

Updated : Dec 5, 2020, 8:14 PM IST

दिल्ली मार्च :केंद्र सरकारबरोबरची शेतकऱ्यांची पाचवी बैठकही निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता पुन्हा ९ डिसेंबरला केंद्रासोबत शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. दरम्यान, उद्या शेतकरी नेत्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. आजची बैठक संपल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषद घेतली. किमान आधारभूत किंमतीला सरकार हात लावणार नसून शेतकऱ्यांच्या सर्व शंका सरकार दूर करेल, असे आश्वासन त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिले.

शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चा करावी, त्यातून तोडगा निघेल असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

काय म्हणाले कृषी मंत्री?

शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा. सरकारने आधाही खूप वेळा चर्चा केली असून पुढेही चर्चा करण्यास तयार आहे. आम्ही बैठकीत शेतकऱ्यांना सांगितले की, सरकार सर्व बाजूंनी विचार करत आहेत. शेतकऱ्यांनी सुचना दिल्या तर आम्हाला अडचणी सोडविण्यासाठी सोप्प होईल. शेतकरी संघटनांनी कोरोना आणि कडाक्याची थंडी पाहता वृद्ध आणि लहान मुलांना घरी पाठवावे, असे आवाहन आम्ही करतो. आंदोलकांनी माघारी जावे, त्यामुळे दिल्लीतील नागरिकांनाही सुविधा मिळतील.

मोदी सरकार जो काही निर्णय घेईल तो शेतकऱ्यांच्या हिताचा असेल. शेतकऱ्यांनी मोदी सरकारवर विश्वास ठेवावा. आंदोलनात शिस्त बाळगल्याबद्दल मी शेतकरी संघटनांचे अभिनंदन करतो. आज चर्चा पूर्ण न झाल्याने ९ डिसेंबरला पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे, असे कृषी मंत्री म्हणाले.

Last Updated : Dec 5, 2020, 8:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details