चंदीगढ - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरयाणामधील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला आहे. यातच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये. 3 डिसेंबरला त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असं तोमर यांनी म्हटलं.
सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग निघेल. शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकार त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. यापूर्वीही कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. मात्र, अनेक कारणांनी चर्चा अयशस्वी झाली. येत्या 3 डिसेंबरला शेतकऱ्यांनी चर्चा करण्यासाठी यावे, असे ते म्हणाले.
नवीन शेतीविषयक कायदे ही काळाची गरज होती. हे येत्या काळात क्रांतिकारक बदल घडवून आणणार आहे. आम्ही पंजाबमधील सचिव स्तरावर आमच्या शेतकरी बांधवांचे गैरसमज दूर करण्याविषयी चर्चा करत आहोत. 3 डिसेंबर यावर चर्चा करू, शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे. चर्चेतून योग्य मार्ग निघेल, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा -