नवी दिल्ली - केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सोमवारी सहकारी संस्थांकडून आरोग्य सुविधांसाठीच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एनसीडीसी आयुष्मान सहकार फंड लाँच केला. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ निधी (एनसीडीसी) आरोग्य सेवांना प्रोत्साहन देईल.
या योजनेंतर्गत एनसीडीसी सहकारी संस्थांना 10 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करेल आणि सोसायट्या त्यातून आरोग्य सुविधा स्थापित करतील.
यावर 'कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सहकारी संस्थांकडून मूलभूत आरोग्य सुविधांच्या बांधकामासाठी दहा हजार कोटी रुपयांचा एनसीडीसी आयुष्मान सहकार निधी सुरू केला आहे,' अशी माहिती पीआयबीने ट्वीट करत दिली आहे.
हेही वाचा -सर्व दहशतवादी मदरसामधूनच वाढले; मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्र्यांचे वक्तव्य