आग्रा - उत्तर प्रदेशात आग्र्याजवळ यमुना द्रुतगती महामार्गावर बस नाल्यात पडून २९ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बसमध्ये ५७ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
आग्रा : यमुना द्रुतगती महामार्गावर बस नाल्यात पडून २९ जणांचा मृत्यू - died
अपघातात अनेकजण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बसमध्ये ५७ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
सोमवारी पहाटे ४:३०च्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. वेगवान बस कठड्यावरून थेट नाल्यात पडल्याची माहिती मिळाली आहे. अवध डेपोची ३३ एटी ५८७७ ही बस लखनऊ येथून येत होती. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या मदतीने बस नाल्यातून वर काढण्यात यश आले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. तसेच, परिवहन विभागाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.