नवी दिल्ली - फाशी देण्यात आलेल्या दहशतवादी अफजल गुरुच्या मुलगा गालिबनं पासपोर्टची मागणी केली आहे. सध्या तो वैद्यकीय प्रवेशासाठी 'नीट' (NEET) परीक्षेची तयारी करत आहे. मात्र, या परीक्षेत कमी गुण मिळाल्यास आणि त्यामुळे भारतात प्रवेश मिळणे शक्य न झाल्यास वैद्यकीय शिक्षणासाठी त्याने तुर्कीला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्की येथे शिष्यवृत्ती मिळू शकते, असे त्याचे म्हणणे आहे. गालिबचे वडील अफजल गुरू याला २००१ मध्ये भारतीय संसदेवर केलेल्या हल्ल्यासाठी २०१३ मध्ये फाशी देण्यात आली होती.
फाशीची शिक्षा झालेल्या दहशतवादी अफजल गुरुच्या मुलाची पासपोर्टची मागणी - pakistan
१० वी तील टॉपर असलेल्या गालिबला १२वीतही ८८ टक्के गुण मिळाले आहेत. काश्मीरचा रहिवासी असलेल्या गालिबला भारताचे आधार कार्ड मिळाले आहे. त्यामुळे तो खूश असून आता त्याला पासपोर्ट हवे आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाता येईल, असे त्याचे म्हणणे आहे.

१० वी तील टॉपर असलेल्या गालिबला १२वीतही ८८ टक्के गुण मिळाले आहेत. काश्मीरचा रहिवासी असलेल्या गालिबला भारताचे आधार कार्ड मिळाले आहे. त्यामुळे तो खूश असून आता त्याला पासपोर्ट हवे आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाता येईल, असे त्याचे म्हणणे आहे. अफजल गुरू हाही शेर-ए-कश्मीर मेडिकल इन्स्टीट्यूटमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. मात्र, नंतर ते सोडून तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाला. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता.
१८ वर्षीय गालिब सध्या त्याची आई तबस्सुम आणि आजोबा (आईचे वडील) गुलाम मोहम्मद यांच्यासोबत राहात आहे. आईने आपला दहशतवादाशी संपर्क येऊ दिला नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. 'मागील काही घटनांमधून आणि चुकांधून आम्ही शिकलो आहोत. माझे वडील डॉक्टर बनू शकले नाहीत. मात्र, मी माझ्या आईचे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करू इच्छितो,' असे तो म्हणाला.