नवी दिल्ली -टि्वटरने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झटका दिला आहे. योगींचे मुस्लीम लीगबाबत केलेले वादग्रस्त टि्वट निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजप नेते गिरिराज सिंह, आमदार मनजिंदर सिंह सिरसा, अभिनेत्री कोयना मित्रा आणि माजी सैन्य अधिकारी सुरेंद्र पुनिया यांचे काही टि्वटही हटवण्यात आले आहेत.
योगींचे 'ते' टि्वट हटवले; टि्वटर इंडियाची कारवाई - Congress
टि्वटर इंडियाने जातीवाचक टिप्पणी केलेली ३४ टि्वट्स हटवली आहेत. जातीयवादी आणि द्वेष निर्माण करणारी विधाने करणाऱ्यांवर कारवाई न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
टि्वटर इंडियाने जातीवाचक टिप्पणी केलेली ३४ टि्वट्स हटवली आहेत. जातीयवादी आणि द्वेष निर्माण करणारी विधाने करणाऱ्यांवर कारवाई न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. नुकतीच निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर ७२ तासांची प्रचारबंदी घातली होती.