नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात घरात बसून वैतागलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी ८० आणि ९० च्या दशकातील जवळपास सर्वच मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्या. रामायण, महाभारत, शक्तिमाननंतर आता ‘श्री कृष्ण’ ही मालिका देखील दूरदर्शन वाहिनीवर पुन्हा प्रदर्शित केली जाणार आहे.
रामायण, महाभारत नंतर आता ‘श्री कृष्णा’ या पौराणिक मालिकेचे पुनर्प्रसारण - लॉकडाउन
लॉकडाउनच्या काळात घरात बसून वैतागलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी ८० आणि ९० च्या दशकातील जवळपास सर्वच मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्या. रामायण, महाभारत, शक्तिमाननंतर आता ‘श्री कृष्ण’ ही मालिका देखील दूरदर्शन वाहिनीवर पुन्हा प्रदर्शित केली जाणार आहे.

श्री कृष्णा ही सर्वाधिक गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. तब्बल २७ वर्षानंतर या मालिकेचे पुनर्प्रसारण टिव्हीवर केले जाणार आहे. या मालिकेमध्ये मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशी आणि सर्वदमन बॅनर्जी यांनी कृष्ण ही भूमिका साकारली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते.
सध्या देशावर कोरोना विषाणूचे संकट आले असून नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. त्यामुळे नागरिक घरात बसून रामायण, महाभारत मालिकेचा आनंद घेत आहेत. नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या मालिका पाहण्यासाठी तेव्हा नागरिक टीव्हीसमोर बसून असत. त्यावेळी रस्ते निर्मनुष्य होत होते. त्यामुळे आताही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी ही मालिका परत एकदा सुरू करण्यात आली आहे.