नवी दिल्ली - '१० दिवसांपूर्वी भारतमातेने अनेक वीरपुत्रांना गमावले. यामुळे देशातील जनता दुःखी झाली आणि संतापलीही. हुतात्म्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती भावना व्यक्त करण्यात आल्या. याची एक देशात लाट तयार झाली. सुरक्षा दलांनी अतुलनीय धैर्याचे पुन्हा एकदा दर्शन घडवले. तसेच, देशाने शांतता पुनर्प्रस्थापित करण्याच्या क्षमता दाखवून दिली,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमाच्या ५३व्या भागाची सुरुवात केली.
मन की बात - पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना मोदींनी वाहिली आदरांजली - 53rd mann ki baat
वीरांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या देशभक्ती, त्याग, तपश्चर्येचा तरुणांनी विचार करावा. त्यातून प्रेरणा घ्यावी. मी त्यांना विनम्र प्रणाम करत आहे. आज राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे सैन्य आणि देशाला लोकार्पण करण्यात येणार आहे. हे देशवासियांसाठी वीरांच्या स्मृतींनी पवित्र झालेले तीर्थस्थळ आहे. - मोदी
मन की बात
'या वीरांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या देशभक्ती, त्याग, तपश्चर्येचा तरुणांनी विचार करावा. त्यातून प्रेरणा घ्यावी. मी त्यांना विनम्र प्रणाम करत आहे. आज राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे सैन्य आणि देशाला लोकार्पण करण्यात येणार आहे. हे राजधानी दिल्लीमध्ये अमर जवान ज्योती आणि इंडिया गेटजवळ बांधण्यात आले आहे. हे देशवासियांसाठी वीरांच्या स्मृतींनी पवित्र झालेले तीर्थस्थळ आहे.' असे म्हणत पंतप्रधान मोदींनी अमर जवानांना आदरांजली वाहिली.