नवी दिल्ली : देशात कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्स्मिशन (सामूहिक प्रसार) होत असल्याचे, अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी मान्य केले. मात्र हा प्रसार केवळ काही जिल्ह्यांमध्येच होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात कोरोनाचा सामूहिक प्रसार होत असल्याचे गेल्या आठवड्यात म्हटले होते. त्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज त्याला दुजोरा दिला.
डॉ. हर्षवर्धन हे आपला साप्ताहिक वेबिनार 'संडे संवाद'मध्ये बोलत होते. यावेळी त्यांना ममता बॅनर्जींच्या दाव्याबाबत सांगत, देशातील इतर राज्यांमध्येही कोरोनाचा सामूहिक प्रसार होतो आहे का, अशी विचारणा करण्यता आली. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले, की विविध राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये तसे आढळून आले आहे. मात्र, याने घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचेही ते म्हणाले.
कित्येक महिन्यांनंतर केले मान्य..