नवी दिल्ली- जेट एअरवेजला सरकारी बँका मदत करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारी बँकांचे कर्ज बुडवून विदेशात गेलेल्या विजय मल्ल्याने ट्विट करून जळफळाट व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सरकारी बँका दुट्टप्पी भूमिका घेत असल्याचे ट्विट मल्ल्याने केले आहे. आपण कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक केली होती, असा त्याने दावाही केला आहे. उद्योगपती विजय मल्ल्याने जेट सरकारी बँका आणि एनडीए सरकारच्या धोरणाबाबत टीका करणारे ट्विट केले आहेत. ज्या सरकारी बँकांनी किंगफिशर एअरलाईन्सला योग्य सहानुभूती दाखविली नाही, त्याच बँका जेट एअरवेजला कर्ज देणार आहेत. सरकारी बँका कर्ज देऊन जेट एअरवेजमधील जॉब, संपर्कयंत्रणा आणि कंपनी वाचवित असल्याबद्दल मल्ल्याने आनंदही व्यक्त केला आहे.
किंगफिशर कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक-
किंगफिशर एअरलाईन्सला वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची योग्य दखल घेण्यात आली नाही. उलट ते प्रयत्न प्रत्येक मार्गाने बंद करण्यात आले. किंगफिशर कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक केली होती, असा त्याने दावा केला आहे.