जयपूर -राजस्थानमध्ये १९ जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले होते. यानंतर आता, भाजपनेही आपल्या आमदारांना शहरातील क्राऊन प्लाझा या हॉटेलमध्ये हलवले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमध्ये असलेल्या पक्षाच्या मुख्यालयात आज भाजप आमदारांची बैठक होणार आहे, त्यानंतर त्यांना बसेसमधून क्राऊन प्लाझा या हॉटेलमध्ये पाठवण्यात येणार आहे. १९ जूनपर्यंत ते या हॉटेलमध्ये राहतील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
याबाबतचा निर्णय हा साधारणपणे महिनाभर आधीच घेण्यात आला होता. आमदारांच्या प्रशिक्षणासाठी आणि इतर काही कामांसाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य भाजपचे अध्यक्ष सतीश पूनिया यांनी दिली.