महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अझहर, दाऊद, लख्वी आणि सईद सुधारीत यूएपीए कायद्यानुसार दहशतवादी घोषित - दाऊद इब्राहिम

केंद्र सरकारने मसूद अझहर, दाऊद इब्राहिम, हफिज सईद आणि झाकिर उल रेहमान लख्वी यांना दहशतवादी घोषित केले आहे.

अझहर, दाऊद, सईद

By

Published : Sep 5, 2019, 8:45 AM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने मसूद अझहर, दाऊद इब्राहिम, हफिज सईद आणि झाकिर उल रेहमान लख्वी यांना दहशतवादी घोषित केले आहे. या वर्षी नव्याने सुधारणा करण्यात आलेल्या बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) ही कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यानुसार आता व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करता येते.

मागील महिन्यात केंद्र सरकारने यूएपीए कायद्यात सुधारणा केल्यानंतर प्रथमच हा निर्णय घेण्यात आला. या कायद्यातील सुधारणेपूर्वी फक्त संघटनेला दहशतवादी घोषित करता येत होते, मात्र, आता व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करता येते. चौघांना दहशतवादी घोषित केल्याची नोटीस केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी जारी केली आहे.

या चारही दहशतवाद्यांविरोधात रेड नोटीस जारी करण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर ५ दहशतवादी कारवाया संदर्भातील गुन्हे नोंदवण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ला घडवून आणल्याचा खटला दाखल्याचा यात समावेश आहे.

लष्कर ए तैयबा संघटनेचा हफिज सईद आणि झाकिर उल लख्वी यांच्यावर ४ दहशवादी गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मुंबई हल्ल्याचा समावेश आहे. तर दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉबस्फोट प्रकरणी दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details