नवी दिल्ली -भारतात कोरोना पाठोपाठ आता आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे. आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला आहे. आसाममधील 306 गावांमध्ये 2 हजार 500 डुक्करांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना पाठोपाठ आता आफ्रिकी स्वाईन फ्लूचा भारतात शिरकाव - कोरोना
आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला आहे. आसाममधील 306 गावांमध्ये 2 हजार 500 डुक्करांचा मृत्यू झाला आहे.
केंद्र सरकारने डुक्करांना मारण्याची मंजूरी दिल्यानंतरही, राज्यसरकार संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पर्यायी यंत्रणा स्वीकारेल, असे राज्याचे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय मंत्री अतुल बोरा यांनी सांगितले.
राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशू रोग संस्थान (एनआयएचएसएडी), भोपाळने हा अफ्रीकी स्वाइन फ्लू (एएसएफ) असल्याचे सांगितले आहे. राज्य विभागाच्या 2019 च्या जनगणनेनुसार आसाममधील डुक्करांची संख्या 21 लाख होती, परंतु अलिकडच्या काळात ती 30 लाखांवर गेली आहे, असे मंत्री म्हणाले.