महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अफगाण विद्यार्थ्याची अहमदाबादमध्ये गळफास घेऊन आत्महत्या - Afghan student ends life

अफगाणिस्तानातल्या एका 24 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने बुधवारी पहाटे गुजरातच्या अहमदाबाद शहरातील वसतिगृहाबाहेर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या
आत्महत्या

By

Published : Jun 17, 2020, 5:49 PM IST

अहमदाबाद - अफगाणिस्तानातल्या एका 24 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने बुधवारी पहाटे गुजरातच्या अहमदाबाद शहरातील वसतिगृहाबाहेर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सिकिब फकीर असे तरुणाचे नाव आहे.

बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह गुजरात विद्यापीठाच्या मुलांना वसतिगृहाबाहेर झाडावर लटकलेला आढळला, अशी माहिती एका अधिकाऱ्यांने दिली. पदवी परीक्षेमुळे तो तणावात असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.

गुजरात विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातून बीबीए (व्यवसाय प्रशासन पदवी) शिक्षण घेत होता. वसतीगृहातील इतर मुले झोपेत असताना त्याने वसतीगृह ब्लॉकच्या बाहेर असलेल्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली.

ABOUT THE AUTHOR

...view details