भोपाल- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. या विषाणूचा धोका गर्भवती महिलांना देखील आहे. कारण गर्भवती अवस्थेत स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीविरुद्ध लढायची कमी क्षमता असते. म्हणूनच गर्भवती महिलांनी काळजी घेणे ही सर्वात महत्वाची बाब आहे.
कोरोना बाबत गर्भवती महिलांच्या मनात प्रश्न नक्कीच येतील. यावेळी त्यांनी काय करावे? या सर्व बाबींवर डॉ. बेला रविकांत यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांनी गर्भवती महिलांना काही महत्वाची माहिती दिली आहे. ती माहिती कोरोनापासून संरक्षण करण्यात उपयुक्त ठरेल.
हेही वाचा-मरकजबाबत जी चर्चा सुरु आहे ती निंदनीय, मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन यांचे मत
तानतणाव घेऊ नका रिलॅक्स रहा...
गर्भवती महिलांनी काळजी करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा महिलांनी अजिबात ताणतणाव घेणे टाळावे. आरामात राहावे, जेणेकरुन तुमचे मन शांत राहील. स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा, मोटिवेशन बुक्स आणि चित्रपट पहात रहा. सध्याच्या घडामोडींपासून लक्ष दूर रहा. जेणेकरुन टेंशन येणार नाही.