महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID19 लस घेतल्यानंतर दिल्लीत काहींना जाणवला त्रास; एकाची स्थिती बिकट - कोरोनाची लसीकरणानंतर त्रास जाणवला

दिल्लीतील ५२ जणांना त्रास जाणवल्याचे समोर आले आहे. यातील ५१ जणांना किरकोळ त्रास उद्भवला तर एकाती प्रकृती गंभीर बनल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Jan 16, 2021, 10:36 PM IST

नवी दिल्ली - कोरोना लसीकरणाचा आज पहिला दिवस पार पडला असून देशभरातील 1,91,181 आरोग्य कर्मचारी आणि संबंधितांना कोरोनाची लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर दिल्लीतील ५२ जणांना त्रास जाणवल्याचे समोर आले आहे. यातील ५१ जणांना किरकोळ त्रास उद्भवला तर एकाती प्रकृती गंभीर बनल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

अर्ध्या तासाने सोडण्यात आले

दिल्लीमध्ये लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ४३१९ जणांना कोरोना लस देण्यात आली त्यातील ५२ जणांना त्रास जाणवला. या लसीचे प्रतिकूल परिणाम होण्याची प्रकरणे दक्षिण दिल्ली आणि नैऋत्य दिल्लीमध्ये सर्वाधिक आढळली. दोन्ही भागात अशी 11 प्रकरणे नोंदली गेली आहेत. दुसरीकडे एनडीएमसीच्या म्हणण्यानुसार, चरका पालिका रुग्णालयाच्या दोन आरोग्य कर्मचार्‍यांनाही कोरोना लसीचे सौम्य दुष्परिणाम जाणवले. या दोघांना त्यांच्या छातीत घट्टपणा जाणवला. दोघांना एईएफआय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. साधारण अर्ध्या तासाने त्यांना सोडण्यात आले.

कोविन अ‌ॅपमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवस लसीकरण थांबवण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. किती लोकांना लस दिली याची नोंद कोविन अ‌ॅपमध्ये करावी लागते. त्यामध्ये अडचणी येत असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details