उत्तराखंड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. त्यामुळे यादरम्यान, उत्तरांखंडच्या रुडकी जिल्ह्यात आलेल्या विविध जमातींच्या लोकांना पिनार कलियर येथील वेगवेगळ्या गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाईन केले आहे.
उत्तराखंडच्या रुडकीत 357 जमातींना केले क्वारंटाईन... हेही वाचा-'पाकिस्तानला काश्मीरसाठी खरच काही करायचं असेल तर...दहशतवाद थांबवा'
आतापर्यंत 357 जमातीच्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्या ठिकाणी त्यांची सर्व सुविधा करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 12 वा दिवस आहे.