गोरखपूर -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दसऱ्यानिमित्त गोरखपूरमध्ये विजयी यात्रा काढली. गोरखपूरच्या महंत गोरक्षनाथ मंदिरातून या विजयी यात्रेला प्रारंभ करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन, यात्रा काढण्यात आली. या यात्रेला मोजक्याच लोकांची उपस्थिती होती.
दसऱ्यानिमित्त योगी आदित्यनाथ यांची गोरखपूरमध्ये विजयी यात्रा
देशभरात दसऱ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन हे कार्यक्रम पार पडले. दरम्यान गोरखपूरमधील महंत गोरक्षनाथ मंदिरातून आज योगी आदित्यनाथ यांनी विजयी यात्रा काढली. दरवर्षी ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. मात्र यावर्षी यात्रेला मोजक्याच लोकांची उपस्थिती असल्याचे पहायला मिळाले.
योगी आदित्यनाथ यांची विजयी यात्रा
यावेळी योगी आदित्यनाथ बोलतांना म्हणाले, की आज संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. या कोरोनाचा प्रभाव सर्वच क्षेत्रावर झाला आहे. सण- उत्सवांवर देखील याचा प्रभाव पडला आहे. मात्र तरी देखील योग्य ती खबरदारी घेऊन आम्ही आमच्या प्रथा, परंपरा जपत आहोत. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने योग्य ती काळजी घेतल्याने, भारतात कोरोनामुळे इतर देशांच्या तुलनेत कमी नुकसान झाले आहे. श्रीरामांच्या कृपेने लवकरच आपण या संकटातून बाहेर पडू असेही ते यावेळी म्हणाले.