नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड केली आहे, अशी माहिती लोकसभा सचिवालयाने दिली आहे.
अधीर रंजन चौधरी यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड - लोकसभा अध्यक्ष
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड केली आहे.

अधीर रंजन चौधरी यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड
लोकलेखा समितीच्या सदस्यांची निवड प्रतिवर्षी केली जाते. लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. 22 पैकी 15 लोकसभेतील तर 7 राज्यसभेतील सदस्यांची निवड लोकलेखा समितीवर केली जाते.
भारत सरकारला संसदेने खर्च करण्यास परवानगी दिलेल्या निधीच्या वापराबद्दलच्या वार्षिक लेख्यांचे परीक्षण करण्याचे काम लोकलेखा समितीद्वारे केले जाते. अधीर रंजन चौधरी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते आहेत.