कोलकाता -पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. बी. एन राधाकृष्ण यांनी त्यांना 'माय लॉर्ड' म्हणण्याऐवजी 'सर' असे संबोधण्यास सर्व अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 'माय लॉर्ड' किंवा 'लॉर्डशीप' ऐवजी मला फक्त 'सर' म्हणा, असे त्यांनी संपूर्ण पश्चिम बंगाल आणि अंदमान येथील न्यायीक अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
'मला 'सर' म्हणा, 'माय लॉर्ड' म्हणू नका'- कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश - टी. बी. एन राधाकृष्ण न्यायाशीध पश्चिम बंगाल
उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार राय चटोपाध्याय यांनी मुख्य न्यायाधिशांच्या विनंतीनुसार सर्वांना एक पत्र लिहले आहे. त्यामुळे फक्त सर असे म्हणा, अशी विनंती न्यायिक अधिकारी आणि न्यायाधिशांना केली आहे.
कोलकाता उच्च न्यायालय
मुख्य न्यायाधिशांनी उच्च न्यायालयातील इतर सर्व न्यायाधीश, जिल्हा न्यायालये आणि कनिष्ठ न्यायालयांना पत्र पाठवून ही विनंती केली आहे. उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार राय चटोपाध्याय यांनी मुख्य न्यायाधिशांच्या विनंती नुसार सर्वांना एक पत्र लिहले आहे. त्यामुळे फक्त सर असे म्हणा, अशी विनंती न्यायिक अधिकारी आणि न्यायाधिशांना केली आहे.