महाराष्ट्र

maharashtra

भारत-नेपाळ सीमारेषेवर अलर्ट; एसएसबीचे अतिरिक्त जवान तैनात

By

Published : Jun 26, 2020, 2:53 PM IST

उत्तरांखडमधून नेपाळला जाणारी खुली सीमा बंद करण्यात आली आहे. नेपाळच्या सीमेनजीक लोकसंख्या कमी आहे. त्या ठिकाणी एसएसबीचे जवान कर्तव्य बजावत आहेत.

भारत-नेपाळ सीमारेषेवर अलर्ट
भारत-नेपाळ सीमारेषेवर अलर्ट

डेहराडून – चीनने पूर्व लडाखमध्य्ये कुरापतखोरपणा सुरू केला असताना नेपाळनेही भारताबरोबर सीमेवरून वाद उकरून काढला आहे. अशा स्थितीत भारताने सशस्त्र सुरक्षा दलाचे (एसएसबी) अतिरिक्त जवान भारत-नेपाळच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. हे सैनिक पिठोरगड धारुचला ते कालापानी या भागात सीमारक्षण करत आहेत.

निरीक्षक संतोश नेगी यांनी इतर सुरक्षादलाबरोबर एसएसबीचे सैनिक तैनात केल्याचे सांगितले. एसएसबीमधील सूत्राच्या माहितीनुसार, नेपाळच्या सीमेवर दक्षता ठेवण्यात येत आहे. उत्तरांखडमधून नेपाळला जाणारी खुली सीमा बंद करण्यात आली आहे. नेपाळच्या सीमेनजीक लोकसंख्या कमी आहे. त्या ठिकाणी एसएसबीचे जवान कर्तव्य बजावत आहेत.

काय आहे भारत-नेपाळ सीमा वाद

भारताने लिपुलेख ते धारचूलापर्यंत रस्त्याचे काम केले आहे. या रस्त्याचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेमध्ये केले होते. त्यानंतर नेपाळ सरकारने सातत्याने आक्षेप घेत लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हा नेपाळचा भाग असल्याचा दावा केला. भारतामधील भूभाग नेपाळमध्ये असल्याचा दावा करणाऱ्या नकाशाला नेपाळच्या संसदेने मंजुरी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details