भुवनेश्वर - अदानी ग्रुप ओडिशामधील फनी वादळग्रस्तांना मदत म्हणून २५ कोटी रुपयांची मदत करणार आहे. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्त केली जाणार आहे. फनी या वादळाचा ओडिशाच्या पूर्वकिनारपट्टीलगतच्या भागांना शुक्रवारी मोठा तडाखा बसला होता.
ओडिशामधील फनी वादळग्रस्तांना अदानी ग्रुप करणार २५ कोटींची मदत - cyclone Fani
अदानी ग्रुप ओडिशामधील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारला पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीने म्हटले आहे. गृहकर्ज, कार, वैयक्तिक अशा विविध कारणांसाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून उशीरा हप्ता मिळाला तरी त्यावर आयसीआयसीआय बँक दंड आकारणार नाही.
आयसीआयसीआय बँकेने ओडिशा मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी १० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. अदानी ग्रुप ओडिशामधील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारला पूर्ण सहकार्य करेल, असे अदानी कंपनीने म्हटले आहे. आयसीआयसीआय बँक मुख्यत: मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी दान करणार आहे. तसेच जिल्हापातळीवरही मदत करणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. तसेच गृहकर्ज, कार, वैयक्तिक अशा विविध कारणांसाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून उशीरा हप्ता मिळाला तरी त्यावर आयसीआयसीआय बँक दंड आकारणार नाही. तसेच क्रेडिट कार्डच्या हप्त्यावरही उशिरासाठी आकारण्यात येणारा दंडही आकारणार नसल्याचे बँकेने म्हटले आहे.
फनी वादळामध्ये शुक्रवारी १६ जणांचा मृत्यू झाला तर हजारो लोक बेघर झाले आहेत. एनडीआरएफच्या पथकाने लाखो नागरिकांना तेथून स्थलांतरित केले. चक्रीवादळामुळे ओडिशामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.