नवी दिल्ली -ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर टीका केली आहे. मोदींनी काल(बुधवारी) अर्थव्यवस्था सावरण्यासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. मात्र, हे पॅकेज फक्त ४ लाख कोटींचे असल्याचे कपिल सिब्बल म्हणाले आहेत.
'मोदींनी जाहीर केलेले आर्थिक पॅकेज फक्त ४ लाख कोटींचेच' - आर्थिक मदत पॅकेज बातमी
रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया ८ लाख कोटी रुपये अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देणार आहे. तर ५ लाख कोटींचे सरकार अतिरिक्त कर्ज घेणार असून एक लाख कोटी रुपये रिवॉल्व्हींग गॅरंटी( ठेवी) मधून मिळणार आहेत, असे सिब्बल म्हणाले.
रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया ८ लाख कोटी रुपये अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देणार आहे. तर ५ लाख कोटींचे सरकार अतिरिक्त कर्ज घेणार असून एक लाक कोटी रुपये रिवॉल्व्हींग गँरंटी( ठेवी) मधून मिळणार आहेत, असे सिब्बल म्हणाले. पंतप्रधान मोदी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचे बोलत आहेत. मात्र, कॅश आऊट फ्लो फक्त ४ लाख कोटींचा असणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, असे सिब्बल म्हणाले.
'आत्मनिर्भर भारत' म्हणजेच स्वयंपूर्ण भारत अभियान सुरु केल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. कोरोनामुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारकडून विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. याद्वारे अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांना मदत करण्यात येणार आहे. भारताच्या एकूण जीडीपीच्या तुलनेत ही रक्कम १० टक्के असल्याचे मोदी म्हणाले.