महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संजय दत्त यांच्या कर्करोगावरील उपचारा बाबत पुढे आली मोठी बातमी.... - अभिनेता संजय दत्त

अभिनेता सजंय दत्त यांना फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान काही महिन्यापूर्वीच झाले होते. सजंय दत्त यांच्यावर सध्या मुंबईमध्ये उपचार चालु आहेत. 61 वर्षीय संजय दत्त हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

Sanjay Dutt
संजय दत्त

By

Published : Oct 20, 2020, 10:36 AM IST

मुंबई -अभिनेता सजंय दत्त यांना फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान काही महिन्यापूर्वीच झाले होते. सजंय दत्त यांच्यावर सध्या मुंबईमध्ये उपचार चालु आहेत. 61 वर्षीय संजय दत्त हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. तसेच ते बरे होऊन लवकर घरी परततील अशी अशाही व्यक्त केलीये.

सजंय दत्त यांनी काही महिन्यापूर्वी आपल्या कामामधून ब्रेक घेतला होता. त्यांनी सर्व चित्रीकरण थांबवले होते. तब्बेतीच्या कारणामुळे आपण काही काळ कामामधून ब्रेक घेत असल्याचे त्यांनी आपल्या चाहात्यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.

संजय दत्त हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत असण्या बरोबर लवकरच ते घरी परतणार असल्याने त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. सजंय दत्त शेवटी सडक 2 या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या सर्व चित्रपटांचे शुटिंग थांबवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details