महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रिलायन्स जिओच्या अ‌ॅक्टिव्ह वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ - रिलायन्स जिओ अ‌ॅक्टिव्ह वापरकर्ते न्यूज

लॉकडाऊनच्या काळात सर्व टेलिकॉम ग्राहक घरीच बसून होते. तरीही या काळात रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांमध्ये घट झाली होती. मात्र, जुलै महिन्याच्या ताज्या आकडेवारीनुसार रिलायन्स जिओच्या अ‌ॅक्टिव्ह वापरकर्त्यांमध्ये वाढ झाली आहे.

Jio
रिलायन्स जिओ

By

Published : Oct 18, 2020, 12:08 PM IST

नवी दिल्ली - जुलै महिन्यात रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांमध्ये २.५ मिलियनने वाढ झाली. त्याच वेळी एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांमध्ये अनुक्रमे ०.४ आणि ३.८ मिलियनची घट झाली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ने जाहिर केलेल्या नवीन माहितीत ही आकडेवारी समोर आली.

फेब्रुवारी महिन्यापासून रिलायन्स जिओच्या अ‌ॅक्टिव्ह वापरकर्त्यांमध्ये झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. जुलै अगोदर जिओच्या ग्राहक संख्या २.१ मिलियनने घटली होती. व्हिजिटर्स लोकेशन रजिस्टर(व्हिएलआर)नुसार अ‌ॅक्टिव्ह वापरकर्त्यांची संख्या मोजली जाते. ट्रायच्या आकडेवारीनुसार देशात एकूण वायरलेस वापरकर्त्यांची संख्या १ हजार १४४ मिलियन आहे, यातील ९५५.८ मिलियन वापरर्ते अ‌ॅक्टिव आहेत. हे प्रमाण टक्केवारीमध्ये ८३.५४ इतके आहे.

ट्रायच्या आकडेवारीनुसार भारती एअरटेलचे सर्वात जास्त(९७टक्के) वायरलेस वापरकर्ते हे अ‌ॅक्टिव आहेत. या तुलनेत जिओ आणि व्होडाफोन-आयडियाचे अ‌ॅक्टिव वापरकर्ते कमी आहेत. जिओचे ७८ टक्के तर व्होडाफोन-आयडियाचे 89.3 टक्के अॅक्टिव वापरकर्ते आहेत. मात्र, व्होडाफोन-आयडिया आण एअरटेच्या तुलनेत जिओच्या एकूण वापरकर्त्यांची संख्या सर्वात जास्त आहे. व्हिएलआरनुसार सध्या रिलायन्स जिओ मार्केटलिडर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details