श्रीनगर - हरवान जिल्ह्यामध्ये मंगळवारी पोलीस आणि सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त कामगिरीमध्ये, दहशतवाद्यांची लपण्याची जागा शोधण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही जागा आताही वापरण्यात होती. याठिकाणाहून विविध शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
याठिकाणाहून यूबीजीएल, ग्रेनेड, जीपीएस आणि एके रायफलची मॅगझीन जप्त करण्यात आली आहे. यासंदर्भातील शोधमोहीम अद्यापही सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
आज सकाळी बंदजू परिसरामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफ जवानांनी शोधमोहीमेस सुरुवात केली होती. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले. एक जवानाला या चकमकीत वीरमरण आले.
सुरक्षा दलाकडून सुरू असलेल्या जोरदार कारवाईमुळे दहशतवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधी सोमवारी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात वेरीनाग जंगलमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्या चकमक झाली. जवानांना जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी शोध मोहिम होती घेत ही कारवाई केली होती. २० जून रोजी कुलगाम जिल्ह्यात झालेल्या इन्काऊंटरमध्ये जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.
हेही वाचा :चीन आक्रमक होण्यामागे काय आहेत कारणे..?