लखनऊ - उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना घडली. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले आहेत. पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर तब्बल चार दिवसांनी आज उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेश चंद्र यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच पीडित कुटंबीयांचा जबाब नोंदवला आहे.
हाथरस पीडित कुटुंबाची युपीच्या अप्पर मुख्य सचिवांनी घेतली भेट - हाथरस पीडित कुटुंब
आज उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेश चंद्र यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच पीडित कुटुंबीयांचा जबाब नोंदवला आहे.
हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाविरोधात राज्यात आणि संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. यातच योगी सरकारने हाथरस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.
तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी गावात संचारबंदी लागू केली असून राजकीय नेत्यावर प्रवेश देण्यात येत नाहीये. गुरुवारी राहुल गांधी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले होते. यावेळी राहुल गांधींना धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी रवाना झाले. मात्र, आज प्रियंका, राहुल गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सीमेवर अडविले आहे. कांग्रेस कार्यकर्ते योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.