भोपाळ : मध्य प्रदेशच्या रतलाममधून जाणाऱ्या बायपासवर एका टँकरमधून अचानक अॅसिड गळती सुरू झाली. त्यामुळे वाहतूकीला काही वेळ अडचण आली, तसेच आजूबाजूच्या गावांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातला जाणाऱ्या या टँकरमध्ये क्लोरोसल्फोनिक अॅसिड होते. रतलाममधून जात असताना अचानक या टँकरमधून अॅसिडची गळती होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले.
रतलाम बायपासवर टँकरमधून अॅसिड गळती, परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण दरम्यान, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत हा टँकर बाजूच्या छोट्या रस्त्यावर नेऊन पार्क केला. त्यामुळे सुदैवाने अद्याप कोणतीही जीवीत वा वित्तहानी झाली नाही. चालकाने वेळीच घेतलेल्या या निर्णयामुळे मुख्य रस्त्यावर अॅसिड पसरले नाही.
यानंतर अहमदाबादमधील ज्या कंपनीमध्ये हे अॅसिड नेले जात होते, तेथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या टँकरमधील अॅसिड दुसऱ्या एका टँकरमध्ये शिफ्ट केले.