पाटणा - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने फेसबुकवरून योगी आदित्यनाथ यांना गोळी घालण्याची धमकी दिली होती. उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला नालंदा येथील दीपनगर पोलीस ठाणे क्षेत्रातून ताब्यात घेतले आहे.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोळी घालण्याची धमकी देणारा अटकेत - योगी आदित्यनाथ यांना धमकी
या व्यक्तीचे नाव तनवीर खान असून तो उत्तरप्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील रकसदा गावातील रहिवासी आहे. तसेच तो वनविभागामध्ये शिपाई म्हणून काम करत आहे.
योगी आदित्यनाथ
या व्यक्तीचे नाव तनवीर खान असून तो उत्तरप्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील रकसदा गावातील रहिवासी आहे. तसेच तो वनविभागामध्ये शिपाई म्हणून काम करत आहे. आरोपीने २४ एप्रिलला फेसबुकवरून योगी आदित्यनाथ यांना गोळी मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी दिलदार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. उत्तरप्रदेश पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे.