नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माने तिहार तुरुंगातील स्वच्छतागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सर्व दोषींना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे, तरीही विनयने आत्महत्येचा प्रयत्न केला.
निर्भया प्रकरणातील दोषी विनय शर्माचा तिहार तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न - vinay sharma attempt to sucide
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माने स्वच्छतागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
विनय शर्मा
निर्भया प्रकरणातील चारही दोषींना तिहार तुरुंगात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. बुधवारी सकाळी विनय शर्माने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दोषींचे वकील ए. पी. सिंह आणि तुरुंगातील सुत्रांनी ही माहिती दिली. मात्र, तिहार तरुंगाचे प्रवक्ते राज कुमार यांनी हे वृत्त फेटाळले आहे.
Last Updated : Jan 17, 2020, 12:41 PM IST