हैदराबाद - हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आला आहे. या एन्काऊंटर नंतर शहरात एकच जल्लोष साजरा करण्यात येत आहे. माझ्या मुलीचा मृत्यू होऊन आज दहा दिवस झाले आहेत. मी पोलीसांच्या या कारवाईप्रकरणी आणि शासनाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया दिशा प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तसेच आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, असेही ते म्हणाले. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच स्तरांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
हैदराबाद एन्काऊंटर : शाळकरी मुलींचा जल्लोष, तर देशातून आल्या 'या' प्रतिक्रिया - शहरात एकच जल्लोष हैदराबाद
मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी या आरोपींची नावे होती. त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.
आरोपींचे एन्काऊंटर; शहरात एकच जल्लोष
तर मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी या आरोपींची नावे होती. त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. या प्रकरणातील पीडितेचे नाव बदलून 'जस्टिस फॉर दिशा' अशा सूचना सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली होती.
सर्वच स्तरांतून उमटल्या 'या' प्रतिक्रिया -
- न्यायालयीन व्यवस्थेद्वारे गुन्हेगारी संपेल, असे नागरिकांचा विश्वास असावा - कुमारी सेलजा (खासदार, राज्यसभा)
- एक आई, मुलगी आणि बायको म्हणून मी या घटनेचे स्वागत करते. अन्यथा ते वर्षानुवर्षे तुरूंगात असते. - नवनीत राणा (खासदार, लोकसभा)
- त्यांना गोळ्या घालण्य़ात आल्या, हा एक चांगला धडा आहे. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ठार मारण्यात आले. कोणत्याही एनजीओने याला विरोध करू नये आणि जर तसे केले तर ते देशद्रोही आहेत. -के. आर. रामकृष्ण राजू (खासदार, वायएसआर)
- तपशील समोर येईपर्यंत आम्ही निषेध करण्यास घाई करू नये - शशी थरुर (खासदार, काँग्रेस)
- दिशाच्या बलात्काऱ्यांना एन्काऊंटरमध्ये शुट करणाऱ्या तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन. जय हो. - अनुपम खेर (जेष्ठ अभिनेते)
- जेव्हा एका गुन्हेगाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांजवळ कोणता पर्याय उरला नाही, असे म्हणू शकतो की न्याय झाला आहे. - भूपेश बघेल (मुख्यमंत्री, छत्तीसगड)
- पोलिसांनी जे केले ते अत्यंत धैर्यांने केले आणि मी असे म्हणतो, या घटनेने न्याय मिळाला आहे. त्यावरील कायदेशीर प्रश्न वेगळी बाब आहेत. मात्र, मला खात्री आहे की देशीतील लोक शांततेत आहेत.- रामदेव बाबा (योगगुरू)
- जे काही झाले ते या देशासाठी अतिशय भयानक झाले. तुम्हाला हवे म्हणून तुम्ही लोकांची हत्या करु शकत नाही. तसेच तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. आरोपींना कोर्टाने फाशी दिली असती. - मेनका गांधी (माजी केंद्रीय मंत्री)
- हैदराबादमधील गुन्हेगारांविरूद्ध जे घडले ते प्रतिबंधात्मक म्हणून काम करेल. आम्ही पोलिसांच्या या कामगिरीचे स्वागत करतो. तर बिहारमध्येही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र, येथील राज्य सरकार उदासीन आहे. - राबडी देवी (राजद नेत्या, बिहार)
- ज्याप्रकारे लोकांचा गुन्हेगारी न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी झाला आहे ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. सर्व सरकारांनी एकत्रित गुन्हेगारी न्याय व्यवस्था कशी मजबूत करावी यावर कार्यवाही करावी लागेल. - अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)
- जनता संतापात आहे. मग ती उन्नाव असो की हैदराबाद बलात्काराच्या घटना उशिरा समोर आल्या आहेत. लोक संतापात आहेत, त्यामुळे लोक चकमकीबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. - अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)
- हैदराबाद पोलीस आणि पोलीसांना पोलीसांप्रमाणे वागण्याची परवानगी देणाऱ्या नेतृत्वाचे अभिनंदन. सर्वांना कळू द्या हा देश असा आहे जेथे नेहमी चांगल्या गोष्टी नेहमी वाईट गोष्टींवर विजय मिळवतात. - राज्यवर्धनसिंग राठोड (माजी केंद्रीय मंत्री)
- 'हैदराबादमध्ये खरी शिवशाही' - प्रविण तरडे (मराठी अभिनेते)
- दोषींवर कारवाई केल्याबद्दल हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन. देशाने आमच्या मुलीचे रक्षण करणे आवश्यक आहे, दोषींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. न्याय मिळाला असे दिसतो. - शायना एनसी (प्रवक्त्या, भाजप)
- पोलिसांचे अभिनंदन. भविष्यात असे एन्काऊंटर करण्याची गरज आली तर सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहावे - प्रणिती शिंदे (आमदार, काँग्रेस)
- हैदराबाद पोलिस चकमक संशयास्पद वाटले. त्याचा शोध लागला पाहिजे. हा खून झालेल्या महिलेसाठी न्याय नाही पोलिसांनी केलेल्या हत्या बलात्कारसारखे गुन्हे थांबवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला समाजाच्या बदलण्याची गरज आहे. बदल बंदुकीच्या गोळीच्या माध्यमातून नाही होणार. - तुषार गांधी (महात्मा गांधीचे पणतु)
- कायद्याची वचक गुन्हेगारांवर बसेल - भार्गवी चिरमुले (मराठी अभिनेत्री)
- कायदावरचा विश्वास कायम ठेवण्यासाठी या प्रकरणाची दखल घेणे आवश्यक -उज्ज्वल निकम (सरकारी वकील)
- छान काम हैदराबाद पोलीस. आमचा तुम्हाला सलाम. - सायना नेहवाल (बॅडमिंटनपटू)
- धाडसी तेलंगाणा पोलीस. माझ्याकडून अभिनंदन - ऋषी कपूर (जेष्ठ अभिनेते)
- प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी - निलम गोऱ्हे (शिवसेना नेत्या)
- 19 व्या शतकातील महिलांना सुरक्षेची हमी देणारी सर्वात मोठी घटना आहे. मुलींच्या मनातील भय कमी होईल. या घटनेतील सर्व पोलिसांचे अभिनंदन. तसेच या घटनेवरुन इतर राज्यातील सरकारी व्यवस्था अपराध्यांना शिक्षा देण्यासाठी मार्ग शोधतील. - उमा भारती (माजी केंद्रीय मंत्री)
- सामान्य नागरिक म्हणून मला आनंद होत आहे. त्यांचा आरोपींचा असा शेवट व्हावा अशी आपली सर्वांची इच्छा होती. मात्र, हा शेवट कायदेशीर यंत्रणेमार्फत व्हावा. हे योग्य माध्यमांतून व्हावे. - रेखा शर्मा (राष्ट्रीय महिला आयोग)
- उत्तर प्रदेशमध्ये गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, राज्य सरकार सुस्त आहे. तसेच दुर्दैवाने या ठिकाणी गुन्हेगारांना पाहुण्यांसारखे वागवले जाते. उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी. - मायावती (अध्यक्ष, बहुजन समाजवादी पक्ष)
- या शिक्षेमुळे मी खूप खूष आहे. पोलिसाने खूप चांगले काम केले आहे आणि पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करू नये, तसेच या देशातील आणि न्याय यंत्रणेने निर्भयाच्या दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. - निर्भयाची आई
Last Updated : Dec 6, 2019, 1:18 PM IST