महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेशात दाट धुक्यामुळे अपघातात १२ जखमी; तर स्कूल बस कालव्यात पडल्याने १० विद्यार्थी जखमी

उत्तरप्रदेशात आज विविध ठिकाणी चार अपघाताच्या घटना घडल्या. दाट धुक्यामुळे समोरून येणार वाहन न दिसल्याने बस आणि कारचा अपघात झाला, तर स्कूल बस कालव्यात पडल्याने १० विद्यार्थी जखमी झाले.

up accident
स्कूल बस कालव्यात पडली

By

Published : Jan 11, 2020, 10:52 AM IST

Updated : Jan 11, 2020, 11:44 AM IST

लखनौ - उत्तरप्रदेशात आज विविध ठिकाणी चार अपघाताच्या घटना घडल्या. राज्यात थंडीमुळे सगळीकडे दाट धुके पसरेल आहे. धुक्यामुळे आग्रा-लखनौ महामार्गावर बस आणि कारचा अपघात झाला. या अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. सर्वांना लखनौमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशात दाट धुक्यामुळे अपघातात १२ जखमी; तर स्कूल बस कालव्यात पडल्याने १० विद्यार्थी जखमी
दाट धुक्यामुळे समोरून येणारे वाहन न दिसल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर इतर तीन वाहने बसला धडकल्याचे माहिती मिळत आहे.तर दुसऱ्या अपघातात शाळेची बस कालव्यात कोसळली. या अपघातात १० विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये एकून २७ विद्यार्थी होते. जखमी विद्यार्थ्यांना कप्तानगंज येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राज्यात आग्रा- दिल्ली महामार्गावर तिसरा अपघात झाला. रस्त्याकडेला शेकोटी पेटवून उबेला बसलेल्या १५ मजूरांना भरधाव कारने चिरडले. यातील १२ जणांचा प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यामध्ये चौथा अपघात झाला. खासगी बस आणि ट्रकची टक्कर होऊन बसला आग लागली. यामध्ये बसमधील १० प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर किमान २२ लोक या अपघातात जखमी झाले आहेत.

Last Updated : Jan 11, 2020, 11:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details