गांधीनगर - गुजरातमध्ये बस आणि कार अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये रविवारी हा अपघात झाला. गळतेश्वर तालुक्यातील डाकोर सेवलिया महामार्गावर अंबाव गावाजवळ हा अपघात झाला.
गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू - डाकोर सेवलिया अपघात
गुजरातमध्ये बस आणि कार अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावर २ किलोमटर लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे. अपघातमध्ये मृत्यू झालेले सर्वजण तरुण होते. सर्वजण गोध्रा येथील रहिवासी होते. वडताल येथून दर्शन करून परत येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला.