बंगळुरू -कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात झालेल्या अपघातात कुंदागोला शिवानंद मठाचे श्री बसवेश्वर स्वामी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह या अपघातात चार जण जागीच ठार झाले. यारीकोप्पा गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर हा अपघात झाला.
शिवानंद मठ शाळेमध्ये आज सकाळी प्रजासत्ताक दिन साजरा करून एका भक्ताच्या लग्नासाठी स्वामी धारवाडकडे जात होते. यावेळी महामार्गावर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह शंकरगौडा पाटील, महादेव कडेशगौला आणि मारूती कुकुनुरा चिक्कोडी हे तिघे या अपघातात दगावले. पाटील हे कुंदागोला गावचे रहिवासी होते, तर बाकी दोघे काब्बुरा गावचे रहिवासी होते.