महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू - बिहार अपघात

बिहारमध्ये येथे मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत.

बिहारमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 ठार तर ३ गंभीर जखमी

By

Published : Nov 9, 2019, 9:22 PM IST

बेतीया -बिहारमध्ये येथे मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात असून घटनास्थळी पोलीस दाखल झाली आहे.

बिहारमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 ठार तर ३ गंभीर जखमी


मझौलिया ठाण्याअंतर्गत बेतीय मोतीहार भागातील एनएच 727 मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने गाडीने टेम्पोला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पोमधील 8 वर्षीय मुलगा, 5 वर्षीय मुलगी, 30 वर्षीय युवक, वृद्ध महिला आणि पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगा, एक महिला आणि एक युवक गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना बेतीया शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे.


दरम्यान स्कॉर्पियो गाडीच्या चालकासह इतर सर्व जण फरार झाले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिक जोरदार प्रदर्शन करत आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details