नवी दिल्ली - आर्टिकल ३७० हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायाधीशांच्या घटना पीठासमोर १ ऑक्टोबरपासून ही सुनावणी होईल. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवण्याचा निर्णय ५ ऑगस्टला संसदेत घेण्यात आला होता.
न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांच्या नेतृत्वाखाली ही सुनावणी होणार आहे. यामध्ये न्यायमूर्ती संजय किशन कौल, आर. सुभाष रेड्डी, बी. आर. गवई आणि सूर्यकांत असतील. सध्या सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील ३ सदस्यीय पीठाद्वारे या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या प्रकरणावरील सुनावणी थांबवण्यात आली आहे.