श्रीनगर- मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवले आहे. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कलम 370 रद्द केल्याने जम्मू काश्मीरमधील पर्यटनावर याचा परिणाम झाला असल्याचे मत तेथील स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
कलम 370 रद्द केल्याचा परिणाम पर्यटनावर; काश्मीरमधील व्यावसायिकांची खंत - कलम 370 रद्द पर्यटक
कलम 370 रद्द केल्याने जम्मू काश्मीरमधील पर्यटनावर याचा परिणाम झाला असल्याचे मत तेथील स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -अल्पवयीन मुलीवर बसमध्ये अत्याचार, दोघांना अटक
गुलाम मोहम्मद आणि नाझीर अहमद हे मागील 30 वर्षापासून गुलमार्ग येथील बर्फाळ प्रदेशात पर्यटकांसाठी बर्फात फिरण्याची गाडी ओढण्याचे (sledge runners) काम करतात. त्यांनी सांगितले की, कलम 370 रद्द केला आहे. मात्र, याचा वाईट परिणाम आमच्या व्यवसायावर झाला आहे. आमची रोजी रोटी याच व्यावसायावर चालते. कलम रद्द केल्यामुळे येथे पर्यटक येणे कमी झाले आहेत. येथील अशांत वातावरणामुळे पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली असल्याची माहिती येथील व्यावसायिकांनी दिली.