चेन्नई - तमिळनाडूचे मुख्यमंत्री तिरू इडाप्पाडी के पलानीस्वामी यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी केंद्र सरकारकडे परमवीर चक्राची शिफारस केली आहे. अभिनंदन यांच्या अतुलनीय शौर्य आणि धैर्यासाठी हा सर्वोच्च सन्मान मिळावा, असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.
विंग कमांडर अभिनंदन यांना परमवीर चक्र द्या, मुख्यमंत्री पलानीस्वामींचे मोदींना पत्र
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी दाखवलेले शौर्य अतुलनीय आहे. पाक सैनिकांनी पकडल्यानंतरही वर्तनातून सभ्यता आणि धैर्याने प्रसंगाला तोंड दिले, असे पलानीस्वामींनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री पलानीस्वामी
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी दाखवलेले शौर्य अतुलनीय आहे. २७ फेब्रुवारीच्या सकाळी भारताच्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना विंग कमांडर अभिनंदन यांनी हुसकावून लावले. पाकिस्तानचे एफ १६ विमान पाडले. तसेच, अभिनंदन यांचे मिग-२१ कोसळत असताना त्यांनी पॅराशूटसह विमानातून उडी मारली. ते नेमके पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले. पाक सैनिकांनी पकडल्यानंतरही वर्तनातून सभ्यता आणि धैर्याने प्रसंगाला तोंड दिले, असे पलानीस्वामींनी म्हटले आहे.